शैक्षणिक सहाय्य, प्रोत्साहन आणि पारितोषिके वर्ष २०२४-२५

आपल्या मंडळाच्या उद्दीष्टामध्ये शैक्षणिक पारितोषिके, मदत, प्रोत्साहन यांना महत्वाचे स्थान आहे. त्यासाठी विविध योजनांद्वारे आपण प्रतिवर्षी अधिकाधिक रक्कम मंडळाचे निधीमधून खर्च करीत असतो. मंडळावरील वाढत्या विश्वासामुळे देणगीदार उदारहस्ते पारितोषिकांसाठी वाढता निधी उपलब्ध करुन देत आहेत. 


शैक्षणिक सहाय्य, प्रोत्साहन आणि पारितोषिकांसाठी अर्ज करण्याची तारीख दि. ३१ ऑगस्ट २०२५ किंवा  दि. ३० ऑक्टोबर २०२५  आहे. अधिक माहितीसाठी कृपया लिंक पुरस्कार, पारितोषिके व सहाय्य तपासा.